Saturday , December 14 2024
Breaking News

बसमधून प्रवास करताना विद्यार्थी गंभीर जखमी

Spread the love

माजी आमदार अरविंद पाटील यांनी केली मदत
खानापूर (वार्ता) : बेळगावहून सागरकडे जाणार्‍या बसमध्ये हल्याळ येथील भरतेश कॉलेजचा विद्यार्थी इशान शंकर पाटील (वय 20) हा बसमधून हल्याळकडे जात होता. बेळगाव-खानापूर महामार्गावरील नावगा ते कौंदलदरम्यान समोरून येणार्‍या ऊस वाहू ट्रॅक्टरला बसमधील विद्यार्थ्याचा हात खिडकीतून ट्रॅक्टरला लागल्याने हाताला गंभीर जखम झाली. त्याचवेळी माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील हे तेथून जात होते. त्यांनी लागलीच थांबून विद्यार्थ्यांला आपल्या वाहनातून खानापूर सरकारी दवाखान्यात दाखल केले. व लागलीच प्राथमिक उपचार करून विद्यार्थ्यांला पुढील उपचारासाठी बेळगावला पाठविले. त्यानंतर त्याच्या पालकांना फोनवरून माहिती देण्यात आली.
माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील हे अपघातावेळी धावून जातात व कशाची पर्वा न करता मदत करतात. त्यामुळे त्यांच्या मदतकार्याचे तालुक्यातून कौतुक केले जाते.

About Belgaum Varta

Check Also

बोगस आदेश काढून अंगणवाडी भरतीत फसवणूक? : ब्लॉक काँग्रेसकडून चौकशीची मागणी

Spread the love  खानापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *