Thursday , November 19 2026
Breaking News

गणेबैलात ऊसाच्या फडाला आग; लाखोचे नुकसान

Spread the love

खानापूर (वार्ता) : गणेबैल (ता. खानापूर) गावच्या सर्वे नंबर 19 आणि 20 या शिवारात शुक्रवारी दि. 21 रोजी भर दुपारी ऊसाच्या फडाला आचनक आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गणबैल येथील शेतकरी मोतिराम लक्ष्मण गजपतकर, कृष्णा कल्लापा गजपतकर, मारूती मोरे, लक्ष्मण महादेव मोरे, रामचंद्र महादेव मोरे आदींचा जवळपास सहा एकर जमिनीत ऊस होता.
शुक्रवारी दि. 21 रोजी दुपारी दोन वाजता अचानक ऊसाला लागली. आगीचे कारण समजू शकले नाही.
ऊसाला आग लागताच गणेबैल गावच्या नागरिकांनी ऊसाच्या फडाकडे धाव घेतली. मात्र आगीने रूद्र अवातार घेतल्याने लागलीच खानापूर अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्यतीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
तालुक्यात अजून ऊस बराच शिल्लक आहे. त्यातच ऊसाच्या फडाला अचानक आग लागण्याचे प्रकारही वाढत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून भितीचे वातावरण पसरले आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

खानापुरात काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाचा दुसरा टप्पा उत्साहात

Spread the love  पक्ष संघटन बळकटीकरणासह नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर चर्चा खानापूर : खानापूर येथील शिवस्मारकात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *