खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड ता. खानापूर येथे प्रजास्ताक दिनादिवशी क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांना फाशी देण्यात आली होती. या बलिदानादिवशी गेली दहा वर्षे युवा नेते पंडित ओगले याच्या नेतृत्वाखाली हिंदु युवकांची खानापूर येथील स्वामी समर्थ मंदिरापासून मोटरसायकल रॅलीचे आयोजन सालाबादप्रमाणे बुधवारी दि. २६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने मलप्रभा नदीघाटावर बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी हिदू युवकांना आवाहन करण्यात आले की, बुधवारी सकाळी १०.३० सर्व युवकांनी मोटरसायकल घेऊन सोबत भगवा झेंडा, त्याचबरोबर शिवाजी महाराजांची तसेच क्रांतीवीर संगोळी रायण्णाची प्रतिमा घेऊन मोटर सायकल रॅलीत सहभागी व्हायचे आहे. यावेळी रॅलीची सुरूवात खानापूर येथील स्वामी समर्थ मंदिरातून होऊन खानापूर मार्गे महामार्गावरुन नंदगड येथील संगोळी रायण्णा समाधी स्थळी जाऊ मोटरसायकल रॅलीची सागंता होणार आहे, अशी माहिती युवा नेते पंडित ओगले यानी दिली.
यावेळी बैठकीला पंकज कुट्रे, राहुल सावंत, नितीन पाटील, महेश गुरव, पिंटू यळ्ळूरकर, ऍड. आकाश अथणीकर, किरण अष्टेकर, विश्वजीत चव्हाण, संभाजी पाटील, अनंत सावंत, मोहन नंदगडकर, शुभम पाटील, संजय गुरव आदी हिंदू युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
