शेतकरी गंभीर जखमी
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील पाली येथील शेतकर्यावर रविवारी दि. 30 रोजी दुपारी 1 वाजता अस्वलाने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाली (ता. खानापूर) येथील शेतकरी विठ्ठल सुटापा झरंबेकर (वय 65) हे नेहमीप्रमाणे रविवारी शेताकडे गेले होते. दरम्यान अस्वलाने अचानक हल्ला करून त्यांना जखमी केले. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी व भाजपच्या कार्यकर्ते प्रविण पाटील यांनी लागलीच खानापूर सरकारी दवाखाण्यात चारचाकी वाहनातून आणण्याची व्यवस्था केली.
सदर घटनेची माहिती मिळताच भाजप नेते पंडित ओगले यांनी सरकारी दवाखान्यात डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार करून घेऊन पुढील उपचारासाठी बेळगावला पाठविण्याची व्यवस्था केली.
यावेळी भाजपचे कार्यकर्ते नितीन पाटील, प्रदीप देसाई, रघू गुरव, महादेव काद्रोळकर, बन्सी कुंभार, आदी कार्यकर्त्यांनी जखमी शेतकर्यासाठी मदत केली.
खानापूर तालुका हा अतिजंगलाचा तालुका आहे. त्यामुळे पाली, डोंगरगाव, शिरोली, आमगाव, आबनाळी, त्याच बरोबर जांबोटी, कणकुंबी, चोर्ला, पारवाड आदी जंगल भागात वारंवार जंगली प्राण्यांचे हल्ले माणसावर होतच आहेत. खानापूर तालुक्यातील जंगलातील खेड्यातील लोकांचे जीवन धोकादायक बनले आहे. तेव्हा लोकप्रतिनिधी त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी या भागातील जनतेतून होत आहे.
