Wednesday , December 6 2023
Breaking News

खानापूरच्या बसस्थानकात समस्यांचे साम्राज्य

Spread the love

प्रवाशी वर्गातून नाराजीचे सुर
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील एकमेव बसस्थानक म्हणून ओळखल्या जाणार्‍या खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवरील बसस्थानक म्हणजे समस्यांचे साम्राज्य पसरले आहे.
बसस्थानकात पाण्याचा जलकुंभ बंदच
खानापूर शहरातील बसस्थानकात गेल्या कित्येक वर्षांपासून जलकुंभ बंदच आहे. या जलकुंभात पाण्याचा साठा नसतो. जलकुंभाच्या चाव्या सुध्दा मोडून पडलेत. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकात पाण्याची सोय नाही. प्रवाशांना सोबत पाणी घेऊन यावे लागते. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी प्रवाशांना धडपड करावी लागते. बसस्थानकात पाण्याची सोय होणे गरजेचे आहे.
बसस्थानकाच्या आवारात खड्ड्याचे साम्राज्य
खानापूर शहरातील बसस्थानकात कोणतीच सोय नाही. बसस्थानकाच्या आवारात जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशाना खड्ड्यामुळे त्रास सहन करावा लागतो.
बसस्थानकाच्या प्रवेशद्वारालाच भले मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसाळ्यात पाणी साचून खड्ड्यातील घाण पाणी प्रवाशाच्या अंगावर उडते. याचा त्रास प्रवाशाना होतो.
बसस्थानकाच्या समोरच झुडपांचे साम्राज्य
खानापूरच्या बसस्थानकाच्या समोरच झाडे, जुडपे वाढली आहेत. त्यामुळे बसस्थानकाचे सौंदर्यच लोप पावले आहे. अशा झुडपातच प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण केएसआरटीच्यावतीने करण्यात आला. मात्र झुडपाचा बंदोबस्त करण्यात आला नाही.
खानापूर बससेवा अपूरी आहे. तालुक्यातून अनेक विद्यार्थी बेळगावला शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र बससेवा अपूरी असल्याने विद्यार्थी वर्गाचे त्रास होत आहेत. तेव्हा जादा बससेवा उपलब्ध करणे गरजेचे आहे.
हायटेक होणार खानापूर बसस्थानकात
खानापूर शहरातील बसस्थानक हे हायटेक बसस्थानक अशी चर्चा खानापूर शहरातून होताना दिसत आहे. मात्र आज खानापूर शहरातील बसस्थानकाची दुरावस्था पाहिल्यास हायटेक बसस्थानक खानापूर शहरवासीयांचे स्वप्नच ठरणार का? असा सवाल सर्वथरातून विचारला जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर समितीच्यावतीने महामेळाव्यासंदर्भात जनजागृती

Spread the love  खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव येथे सोमवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *