खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील झुंजवाड के. एन. येथील उच्च प्राथमिक शाळेच्यावतीने गावातील देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष महाबळेश्वर धबाले होते. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष परशराम बेतगावडा, उपाध्यक्षा रूक्मिणी पाटील, सदस्य तसेच ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.
झुंजवाड केएन गावच्या सैनिकानी शाळेसाठी नविन ध्वजस्तंभ व ध्वजकट्टा जवळपास ८० हजार रूपये खर्च करून तयार केला. यानिमित्ताने त्या सैनिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
प्रारंभी श्रीमती ए. आर. जोशी यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी कार्यक्रमाला मुख्याध्यापिका श्रीमती अनिता रामचंद्र पाटील, सुभेदार प्रकाश पाटील, ज्येष्ठ नागरिक गुंडू गावडा, आर. बी. साळे, एम. आर. तटपूरे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आर. बी. कोळी यांनी केले. तर आभार श्रीमती के. एन. पुजार यानी केले.
Check Also
गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी
Spread the love खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा …