बेळगाव : 18 डिसेंबर रोजी दंग्याचे कारण दाखवून शुभम शेळके व अंकुश केसरकर यांच्यासह 38 जणांना मार्केट पोलिसांनी अटक केली, त्यानंतर त्या 38 जणांनी तसेच जे अटक नाहीत त्या सर्वानी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन याचिका दाखल केली पण 31 डिसेंम्बर 2021 रोजी 42 जणांची याचिका आठवे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळली, त्यानंतर त्यातील 41 जणांनी उच्च न्यायालयात जामीन मिळवला, पण मदन बामणे यांची याचिका उच्च न्यायालयात न दाखल करता पुन्हा सत्र न्यायालयात जामीन याचिका दाखल केली, परिस्थिती बदला नुसार येथेच जामीन मिळावा अशी मागणी केली ती आठवे जिल्हा सत्र न्यायालयाने मान्य करत मदन बामणे यांचा जामीन अर्ज विविध अटींवर मान्य करण्यात आला.
खडेबाजार पोलीस स्थानक 5 गुन्ह्यात जामीन 3 रे JMFC न्यायालयाने मदन बामणे यांना 5 खटल्यात जामीन मंजूर केले.
आज एकूण सहा खटल्यात जामीन मंजूर झाला.
यांच्या वतीने अॅडव्होकेट महेश बिर्जे, अॅडव्होकेट एम. बी. बोन्द्रे, अॅडव्होकेट रिचमॅन रिकी यांनी कामकाज पाहिले.
