

खानापूर : रंजिता प्रियदर्शनी व स्रीरोग्य तज्ञ असलेल्या खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीच्या रजेचे धोरण लागू करून दरमहा एक दिवस पगारी सुट्टी द्यावी अशी मागणी वेळोवेळी सरकारकडे केली होती, पुढे जाऊन ही मागणी अनेक महिलांनी उचलून धरली. दरम्यान सिद्धरामय्या सरकारने ही मागणी मान्य केली.
स्रीरोगतज्ञ असलेल्या डॉ. अंजलीताई यांनी सरकारकडे ही मागणी वेळोवेळी लावून धरली होती. कामाच्या ठिकाणी महिलांना ज्या ज्या काही अडचणींचा सामना करावा लागतो त्यासंदर्भात ताई नेहमीच जागरूक असतात, स्रीयांचे जीवन अधिकाधिक सुखकारक व्हावे यासाठी प्रयत्नशील असतात.
सिद्धरामय्या सरकार स्रीयांसाठी अनेक योजना राबवित असून ही पण महत्वाची मागणी सरकारने मान्य केली असल्याने डॉ. निंबाळकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta