

खानापूर : खानापूरच्या माजी आमदार व अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडे संघटन सृजन अभियानांतर्गत उत्तराखंडनंतर आता तेलंगणाचीही जबाबदारी पक्षाने सोपविली आहे.
पक्ष संघटनेमधील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे यापूर्वीही अनेक राज्यात संघटना सक्षम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुढील दहा दिवस त्या तेलंगणाच्या दौऱ्यावर असून त्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. खानापूर तालुक्यातील जनतेने विश्वास ठेवून तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली. तालुक्यातील जनतेच्या पाठबळामुळेच पक्षाने मला राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास प्रवृत्त केले. पक्षाच्या जबाबदाऱ्या पार पाडतानाच माझ्या तालुक्यातील जनतेच्या समस्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेत आहे. त्यामुळे. जनतेने त्यांच्या समस्या पक्षाकडे मांडाव्यात, असे डॉ. निंबाळकर यांनी म्हटले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta