खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील इदलहोंड, सिगीनकोप, अंकले, गणेबैल, निट्टूर, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, निडगल, बरगाव आदी भागात वीट व्यवसाय मोठ्याप्रमाणात चालतो.
या भागात वीट कामगार म्हणून यमकनमर्डी, गोकाक, हुक्केरी, हल्याळ, बेळगाव तालुक्यातील विविध गावचे नागरीक मोठ्या संख्येने नोव्हेंबर ते मार्चपर्यंत शिवारात स्थायीक होतात. हे वीट कामगार आपल्या सोबत शालेय विद्यार्थी, जनावरे, आपले कुटूंब घेऊन येतात.
मात्र शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय होणे कठीण होते. म्हणून वीट कामगारांच्या मुलासाठी तंबू शाळेचे आयोजन हे खूपच विद्यार्थी वर्गाला फायदेशीर ठरते. यासाठी बीईओ कार्यालयाच्यावतीने तसेच बीआरसीच्यावतीने गर्लगुंजी, इदलहोंड भागात तंबू शाळेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
या तंबू शाळा उद्घाटनाच्या प्रसंगी बीआरसी अधिकारी ए. आर. आंबगी, सीआरपी गोविंद पाटील, इदलहोंड उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ए. आर. पाटील, गर्लगुंजी मराठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष चोपडे, शिक्षिका म्हणून संगीता तारीहाळकर, वीट उद्योजक सहदेव मेलगे, वीट कामगार आदी उपस्थित होते.
यावेळी तंबू शाळेसाठी 17 विद्यार्थी हजर होते. या 17 विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करण्यात आल्याने याभागातील वीट कामगारांतून समाधान पसरले आहे.
यावेळी बोलताना बीआरसी आधिकारी ए. आर. आंबगी म्हणाले की, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने तंबू शाळेचे आयोजन केले आहे. या तंबू शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहाराची सोय केली जाणार आहे. याशिवाय इतर सोयी ही दिल्या जातील. तेव्हा वीट कामगारांनी आपल्या मुलाना नियमित तंबू शाळेला पाठवून देण्याचे आवाहन करण्यात आले.
Check Also
खानापूर-लोंढा महामार्गावर अपघात : एक ठार, एक गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : खानापूर-लोंढा महामार्गावर जोमतळे गावानजीक, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वेगाने रस्त्या …