खानापूर (प्रतिनिधी) : माणिकवाडीत (ता. खानापूर) येथे पोवाडा कार्यक्रमाचे औचित्य साधुन शिवशाहीर व्यंकटेश देवगेकर यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
यावेळी कार्यक्रमाला भाजप नेते व श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, शिवशक्ति सोसायटीचे संस्थापक शंकर पाटील, ग्राम पंचायत सदस्य व प्रा. शंकर गावडा, सदस्या सौ. प्रीती गोरल, माजी सैनिक महादेव गावडा आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पुजन करण्यात आले.
यावेळी बोलताना विठ्ठल हलगेकर म्हणाले की, शाहिर आपल्या पोवाड्याच्या कलेतुन शिवचरित्र जीवंत करतात. छत्रपती शिवरायांचा तेजस्वी इतिहास समाजासमोर मांडतात. तो इतिहास स्मरून आपण वाटचाल केली पाहिजे, असे विचार व्यक्त केले.
यावेळी शंकर पाटील यानी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शंकर गावडा यांनी केले. यल्लारी सुतार यांनी सूत्रसंचालन केले. आभार भुजंग मयेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवभक्त तरुण मंडळ परशराम गोरल, हणमंत होनगेकर, विष्णू होनगेकर, रमेश मयेकर, राजू सुतार, सदानंद होनगेकर, नामदेव गावडा, राघवेंद्र मयेकर, रोहित गावडा, एकनाथ गावडा, नागेश होणगेकर, विनायक गावडा, जयराम सुतार, पुंडलिक सुतार, नवनाथ कुमरतवाडकर यांनी सहकार्य केले.