खानापूर (प्रतिनिधी) : चापगांव (ता. खानापूर) येथील मलप्रभा हायस्कूलच्या पटांगणावर सर्पमित्र उमेश अंधारे यांनी लहानपणापासून मुलाच्या मनातील सापाविषयीची भिती दुर व्हावी. तसेच विविध सापाच्या जाती व साप हा शेतकऱ्याचा मित्र कसा आहे याबद्दलही माहिती दिली.
यावेळी त्यांनी यडोगा येथे पकडलेल्या विषारी नाग सर्पाविषयी माहिती दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विषारी आणि बिनविषारी साप कोणते याविषयी सुध्दा त्यांनी माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधुन सर्पमित्र उमेश अंधारे यांचा हायस्कूलच्यावतीने शाल, श्रीफळ, शाल घालुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही. बी. होसुर होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शंकर पाटील, सुदन देसाई, सहशिक्षक एन. एन. दळवाई, पी. बी. पाटील, एस. एस. नंद्याळकर, बी. बी. बेळगावकर, एम. एन. बस्तवाडकर, आप्पाजी पाटील, तसेच शाळा सुधारणा समितीचे सदस्य, गावकरी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. पी. सनदी यांनी केले. तर आभार प्रदर्शन पी. के. चव्हाण यांनी मानले.
