Friday , April 17 2026
Breaking News

बेकवाड- बिडी मार्गावर बर्निंग ट्रक

Spread the love

शाॅर्टसर्किटमुळे ट्रकचे प्रचंड नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर यल्लापूर महामार्गावरील बेकवाड बिडी दरम्यान धावणाऱ्या ट्रकला गुरूवारी दि. ३ रोजी दुपारी अचानक आग लागल्याने ट्रक जळुन खाक झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खानापूर यल्लापूर राज्यमार्गावर बेकवाड बिडी दरम्यान केए २२ बी ४०५८ क्रमांकाचा ट्रक खानापूरहुन बिडीकडे येत होता. यावेळी बेकवाड जवळील स्पीडब्रेकवर ट्रकचा सायलन्सर पडला. त्यामुळे ट्रकचा आवाज वाढत गेला. त्यातुन शाॅर्टसर्किटमुळे शखीब महमद पटेल यांच्या मालकीच्या ट्रकने पेट घेतला बघता बघता ट्रकचा समोरील बाजू पेटायला सुरूवात झाली.
बेकवाड येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाळेकुंद्री यांनी लागलीच खानापूर अग्नीशामक दलाला माहिती दिली. अग्नीशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग विझविली. याचवेळी रस्त्याच्या बाजूला पडलेल्या ऊसाच्या कचऱ्याला आग लागली. त्यामुळे बाजूचा शेतातील ऊसानेही पेट घेतला. त्यामुळे येथील अर्धा एकर जमिनीतील ऊस जळुन खाक झाला.
यावेळी अग्नीशामक दलाचे ठाणा अधिकारी मनोहर राठोड तसेच त्यांचे सहकारी रोशनबेग बेपारी, राहुल जंगली, शंकरय्या, संजय जंजी इतरांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझविली. या आगीत ट्रकचे लाखोचे नुकसान झाले आहे. सदर ट्रक हा साखर कारखान्याला ऊस देऊन रामापूरनंदगड येत-जात होता. यावेळी ही दुर्घटना घडली.

About Belgaum Varta

Check Also

हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने प्रकाश मरगाळे आणि अंकुश केसरकर यांचा सत्कार

Spread the love  खानापूर : हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने महराष्ट्र एकीकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *