
तिवोली : तिवोली येथील श्री लक्ष्मीदेवी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमन अध्यक्षपदी श्री. रमेश महादेव पाटील यांची तर व्हा. चेअरमन उपाध्यक्षपदी श्री. पोमाणी द. नाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानिमित्त मावळते चेअरमन श्री. सहदेव शांताराम हेब्बाळकर व श्री. मऱ्याप्पा म. पाटील यांच्या हस्ते नूतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नूतन चेअरमन श्री. रमेश पाटील यांनी येणाऱ्या काळात संस्थेच्या सभासदांच्या हितासोबतच संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी संचालक मंडळाला सोबत घेऊन योग्य व हिताचे निर्णय घेतले जातील असे सांगितले. संचालक श्री. यशवंत ब. देसाई यांनी आपल्या भाषणात सांगितले की, तिवोली येथील श्री लक्ष्मीदेवी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीने आजवर परिसरातील अनेक गरजू नागरिकांना आर्थिक अडचणींमध्ये मोलाची साथ दिली असून, ही सेवा पुढेही अखंड सुरू राहावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी श्री. सुभाष ना. पाटील तसेच श्री. फ्रान्सिस मिं. परेरा यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला अध्यक्ष श्री. रमेश म. पाटील, उपाध्यक्ष श्री. पोमाणी द. नाळकर, संचालक श्री. सहदेव शा. हेब्बाळकर, संचालक श्री. मऱ्याप्पा म. पाटील, संचालक श्री. सुभाष ना. पाटील, संचालक श्री. यशवंत ब. देसाई, संचालक श्री. धनंजय प. हेब्बाळकर, संचालक श्री. शशिकांत पुं. लाटगांवकर, संचालक श्री. प्रकाश प्र. पिंटो, संचालक श्री. फ्रान्सिस मिं. परेरा, संचालक श्री. वासुदेव शि. सुतार, संचालक सौ. उज्वला य. लाटगांवकर, संचालक सौ. रेणुका भ. मादार तसेच संस्थेचे सेक्रेटरी श्री. दिपक मा. देसाई संस्थेचे मार्गदर्शक, सेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta