Monday , December 15 2025
Breaking News

कणकुंबी ग्राम पंचायत पी.डी.ओं.ना न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस

Spread the love

 

खानापूर : कणकुंबी ग्राम पंचायत हद्दीतील ग्राम पंचायत मिळकत नं. 704 ही मिळकत पुर्वजात दिपक गुंडू वाडेकर व त्यांच्या इतर कुंटुंबीयांना यांच्या पुर्वजात मालकी कब्जात असून हि मिळकत पुर्वीपासून गुंडू वाडेकर यांच्या नांवे ग्राम पंचायत दप्तर मध्ये नोंदणी आहे. सदर मिळकतीबाबत पंचायत टॅक्स वगैरे मयत गुंडू चिमणा वाडेकर व त्यांचे कुंटुंब भरणा करीत आलेले आहेत. सदर मिळकत पंचायत रेकॉर्ड प्रमाणे 1995-96 सालापासून ते 2011-12 पर्यंत मयत गुंडू चिमणा वाडेकर, यांच्या नांवे मालक व कब्जेदार म्हणून नोंद होती. तदनंतर गुंडू चिमणा वाडेकर मुळ पुरुष मयत झाल्यानंतर सदर मिळकतीबाबत श्री. दिपक गुंडू वाडेकर व बंधू महेश गुंडू वाडेकर सरळ वारसदार या नात्याने ठराव नं. 3, मिटिंग नं. 5 दिनांक. 24/01/2012 पंचायत मिटिंग मध्ये कायदेशिर ठराव पास होवून दोन वारसदारांची नांवे दप्तरी नोंद करणेबाबत ठराव पास करण्यात आला. तदपुर्वी सदर मिळकत कणकुंबी ग्राम पंचायत नं. 4/676 सध्या नं. 704 बदल होवून सदर रेकॉर्डबाबत सरकारच्या हुकुमानुसार (कंम्प्युटर उतरा) प्रत्यक्ष कब्जा व मालकी हक्क यांची चौकशी करुन कंम्प्युटर उतारा देण्यासंदर्भात दिपक गुंडू वाडेकर यांनी कायदेशीररित्या परंपरागत पी.डी.ओ. ग्राम पंचायत कणकुंबी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता.
सदर अर्जाची छाननी करुन व प्रत्यक्ष कब्जा वहीवाटीची पाहणी करुन, कंम्प्युटर उतारा तयार करण्याच्या संदर्भात कायदेशीर पुर्तता करुन, मेहरबान तहसीलदार, सर्कल, सर्वे डिपार्टमेंट पाठवून सदर संबंधीत अधिकारी यांनी पाहणी करुन व सर्वे करुन ग्राम पंचायत नं. 704 या मिळकतीच्या हक्कासंबंधात सर्वे, नकाशा, (पी.टी. शीट) तयार करुन सदर मिळकतीचे मोजमाप कब्जा वहिवाटीप्रमाणे पंचायत रेकॉर्डला नमुद करुन आर.डी.पी.आर नंबर नोंद करुन 150400708200320019 क्षेत्र 15563.00 चौ.मीटर. पुर्व-पश्चिमः 89108 मी. दक्षिण-उत्तरः 158 चौ. मीटर व कायदेशीर बाबीची पुर्तता करुन दिपक गुंडू वाडेकर व कुंटुंबीयांना त्यांच्या नांवे कंम्प्युटर उतारा सुद्धा देण्यात आलेला आहे. सदर संदर्भात कायदेशीर टॅक्स भरणा केलेली आहे. व सदर पी.डी.ओ. सुनिल आंबारे यांनी सदर मिळकतीमध्ये इलेक्ट्रीसीटी सप्लाय बदल, कंपाऊंड व बिल्डींग बांधकाम सर्व परवाने कायदेशीर (NOC) दिलेली आहेत.
तदनंतर पंचायत पी.डी.ओ यांनी सदर संबंधीत ठरावाची नक्कल मालकी, हक्क संदर्भात सर्टिफीकेट दिले आहे.
सदर बाबत कोणत्याही प्रकारचा संबंध नसलेल्या लोकांनी पंचायतकडे तक्रार दिल्या कारणाने सदर प्रकरण न्यायालयात दाखल केल्यामुळे पुर्वीपासून नमुद असलेल्या रेकॉर्डला किंवा यापुढे सदर संपुर्ण मालकी बाबत सिव्हील दावा वरिष्ट सिव्हील कोर्ट न्यायालयामध्ये दि. 11/04/2025 रोजी वाटणी संदर्भात दाखल करण्यात आला. सदर प्रकरण न्याय प्रवीस्ट असल्याकारणाने व वाटणी दावा असल्याकारणाने सिव्हील कोर्टाने पुढील आदेश होईपर्यंत कोणत्या प्रकारचे बदलावणे करु नये याचा आदेश दि. 28/06/2025 रोजी तात्पुरती मनाई हुकुम केलेला आहे. सदर प्रकरण कोर्टामध्ये विचाराधीन आहे. व कोर्टाने कायमस्वरुपी मनाई आदेश बजावलेला नाही, असे असता पी.डी.ओ. ग्राम पंचायत कणकुंबी यांनी विरुद्ध पक्षकारांशी संगनमत करुन प्रकरण न्याय प्रविस्ट असताना व कोणत्याही वरिष्ट अधिकाऱ्याचा आदेश नसताना बेकायदेशीरपणे व आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करुन स्वतः दिलेल्या पत्राच्या आधारे नोंद असून पुन्हा विरुद्ध पार्टीशी संगनमत करुन पुर्वी कायदेशीर नोंद झालेली रेकॉर्ड याच्यामध्ये आदलाबदल करुन व अधिकार नसताना दि. 15/11/2025 रोजी स्वतः पुर्वीच्या रेकॉर्ड कायदेशीर दाखल असून सुद्धा भ्रष्टाचारामुळे स्वतःचे रेकॉर्ड इनव्यालीड व डिलिट (पुर्वीचे रेकॉर्ड रद्दी केल्याबाबत प्रतिस्पर्धी बेकायदेशीर सर्टीफीकेट दिले आहे).
या संदर्भात या पुर्वी सदर पी.डी.ओं.ना कोर्टामध्ये कोर्टामध्ये केस चालु असून केस नं. 65/2025 कोणत्याही प्रकारची आदला बदला न करण्याचे असून सुद्धा याबाबत फेरवी पत्राद्वारे पी.डी.ओ. यांना कळविले आहे. दि. 08/07/2025 व याबाबत पोच नोंद घेतलेली आहे. असे असताना सदर पी.डी.ओ. यांनी कोणात्याही प्रकारची नोटीस श्री. दिपक गुंडु वाडेकर यांना न देता व कायदेशीर बाबींची पुर्तता न करता दि. 15/11/2025 रोजी सदर बाबत सर्टीफीकेट दिलेले आहे. या संदर्भात दिपक गुंडू वाडेकर यांचे वकील एच. एन. देसाई यांनी सदर बेकायदेशीर कृत्य न्यायालयाच्या नजरेला आणून दिले. सदर पी.डी.ओ यांना न्यायालयात पार्टी करून त्यांच्या विरुद्ध प्रकरण न्याय प्रविस्ट असताना रेकॉर्ड मध्ये फेर बदल करुन न्यायालयाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला असून आधिकारांचा दुरुपयोग करून पक्षकाराशी संगनमत करुन बेकायदेशीर पेपर तयार केल्यासंदर्भात न्यायलयासमोर सदर पी.डी.ओ. विरुद्ध सक्त करवाई करावी असा अर्ज दाखल केला आहे.
या संदर्भात न्यायालयाने विचारणा करुन दि 04/12/2025 रोजी Civil Misc No. 5/2025 चौकशी प्रकरण नोंद केले आहे. व सदर पी.डी.ओ. ला न्यायालयात स्वतः हजर राहण्याचे आदेश दिले आहे. दि. 19/12/2025 रोजी न्यायालयाच्या हुकुमाप्रमाणे पी.डी.ओ. स्वतः न्यायालयात हजर होवून सदर बाबत आपले म्हणणे मांडण्याची सुचना केली आहे. सदर नोटीसमुळे खानापूर तालुक्यातील पी.डी.ओ. चे दाबे दणाणले आहेत. या प्रकरणात पी.डी.ओ. वर कोणती कारवाई होणार याकडे खानापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष नजर लागुन राहिले आहे.

About Belgaum Varta

Check Also

महामेळावा : खानापूर समितीच्या पदाधिकाऱ्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात!

Spread the love  बेळगाव : आज रोजी बेळगाव सुवर्णसौध येथे होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *