खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यात शुक्रवारी दि. ४ रोजी पहाटेपासून धुके पडण्यास प्रारंभ झाला.
पहाटेच्यावेळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना धुक्याचा अनुभव आला. धुके पडल्याने महामार्गावर वाहनचालकांना वाहनाना दिवे लावून वाहने चालवावी लागली.
धुक्यामुळे काजू, आंबा झाडाना आलेला मोहोर जळुन जाण्याची शक्यता शेतकरीवर्गातून वर्तविण्यात येत आहे.
यावर्षी काजू, आंब्याच्या झाडाना नुकताच मोहोर आला होता
त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान पसरले होते.
मात्र शुक्रवारी पहाटे पडलेल्या धुक्यामुळे काजू, आंबा पिकांचा मोहोर जळुन जाण्याची भिती वाटत आहे.
खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाचा जोडदंधा म्हणून काजू, आंबा पिकाकडे पाहिले जाते. शेतकरीवर्गाला काजू, आंबा पिकांचे चांगल्याप्रकारे उत्पादन मिळते.
मात्र जर धुक्के पडून काजू, आंबा पिकाचा मोहोर जळून गेला तर शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून भितीचे सावट पसरले आहे.
