Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूर समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलची खेळाडू अदिती नाडगौडा हिची ज्युनिअर १९ वर्षखालील राष्ट्रीय नेटबाॅल स्पर्धेसाठी निवड

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलची नेटबाॅल खेळाडू अदिती डी. नाडगौडा हिची कर्नाटक राज्य ज्युनिअर १९ वर्षाखालील नेटबाॅल संघात निवड झाली आहे.
कर्नाटकाच्या अँमेच्योर नॅटबाॅल असोसिएशनने राज्यात नेटबाॅल संघाची निवड केली. या निवडीत कर्नाटक राज्य नेटबाॅल संघात तिची निवड झाली. कर्नाटक राज्यातील अनेक प्रतिभावंत १९ वर्षाखालील नेटबाॅल खेळाडू उपस्थित होते.
मात्र खानापूर समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलची अदिती डी. नाडगौडा ही केवळ १२ वर्षाची खेळाडू तिच्या कौशल्याच्या जोरावर उत्कृष्ट खेळामुळे तिची चाचण्यादरम्यान निवड झाली.
आता अदिती डी. नाडगौडा ही येत्या २३ मार्च ते २८ मार्च दरम्यान उत्तर प्रदेशातील मेरठा येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील ज्युनिअर राष्ट्रीय नेटबाॅल संघाचे कर्नाटकाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
देशभरातील अनेक नेटबाॅल संघ या १९ वर्षाखालील ज्युनिअर राष्ट्रीय नेटबाॅल स्पर्धेत भाग घेणार आहेत.
अदिती डी. नाडगौडा हिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अदिती डी. नाडगौडा ही खानापूर डॉक्टर असोसिएशन चेअरमन व समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलचे सचिव डाॅ. डी. ई. नाडगौडा व समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या अँडमिन सौ. दिव्या डी. नाडगौडा यांची कन्या आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *