खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातून वेगवेगळ्या मार्गांनी गोवा राज्यात होणारी चोरटी गो वाहतूक रोखण्यासाठी तसेच गोहत्या रोखण्यासाठी खानापूर भाजपा युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदनामध्ये म्हटले आहे की, कर्नाटक राज्यात गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला असला तरी लींगनमठ -आळणावर, लोंढा – रामनगर, खानापूर – हेमाडगा व जांबोटी-चोर्ला या चार महामार्गावरून चोरटी वाहतूक होत असुन बूधवारी दि. २१ रोजी ईद सण असल्याने वाहतूक जोरात चालली आहे तसेच खानापूर तालुक्यात सुध्दा गोहत्या, कत्तली मोठ्या प्रमाणात होणार आहेत तेव्हा गुरांची, गाईंची चोरटी वाहतूक बंद करण्यात यावी तसेच तालुक्यात होणारी गोहत्या रोखण्यात यावी व संबंधितांवर गोहत्या प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना बाळाराम सावंत, जॉर्डन गोन्सालवीस, प्रकाश निलजकर, आनंद सावंत, किरण तुडयेकर, पवन गायकवाड, महेश गुरव, पंकज कुट्रे, राजु गुरव, सुशांत गुरव, संजय मयेकर, राज गावडे, पिंटू येळ्ळूरकर, रोहीत गुरव, संजु गुरव, परशराम गुरव, व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.