खानापूर (प्रतिनिधी) : हलशी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत पालक मेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष सुभाष हट्टीकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून
माजी एसडीएमसी अध्यक्ष श्रीकांत गुरव व इतर सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मुलींच्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक एल. डी. पाटील यानी केले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी पालक व शिक्षक याच्यामध्ये संवाद होऊन ज्या पालकांची मुले शाळाबाह्य आहेत. अशा मुलांचा अभ्यास पालकांनी काळजीपूर्वक घ्यावा, अशी चर्चा झाली. याबाबत व्ही. एस. माळवी यांनी आपले विचार व्यक्त केले.
निपून भारत कार्यक्रमाचे उद्देश श्रीमती एस. आर. पाटील यांनी सांगितले.
पालक श्रीकांत गुरव यांनी पालक, शिक्षक यांचा संगम कसा असावा. याबद्दल विचार व्यक्त केले. तर मातृभाषेतुन शिक्षण हेच योग्य आहे असे सांगून येणारे वार्षिक स्नेहसंमेलन व अमृतमहोत्सवी सोहळा मोठ्या थाटात पार पाडू असे सांगितले.
यावेळी हलशी परिसरातील अनेक पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एम. डी. मुधोळ यांनी केले. यावेळी एसडीएमसी सदस्य महादेव जाधव, किरण पेडणेकर, गणपती पाटील, शंकर अंग्रोळकर, सदस्या सौ. रेखा पाटील, लक्ष्मी हलगेकर, रेणूका झुंजवाडकर, माया कामती, लक्ष्मी पेडणेकर, सुवर्णा जोगळेकर, तसेच अनिल देसाई उपस्थित होते. शिक्षक एस. एच. चवलगी, जी. एन. घाडी, एस. एस. गौडा व अतिथी शिक्षक उपस्थित होते. आभार एस. एच. चवलगी यांनी मानले.
