Saturday , July 27 2024
Breaking News

श्री रेणुकादेवी दर्शनाला मुभा मात्र, यात्रेला परवानगी नाहीच : रवी कोटारगस्ती यांची माहिती

Spread the love

सौंदत्ती : शासनाने राज्यभरातील मंदिर आणि देवस्थानांमध्ये दर्शनासाठी भाविकांना मुभा दिली आहे. मात्र, सण, उत्सव, यात्रा आदींवर लावलेले निर्बंध कायम आहेत.त्यामुळे सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविकांना नियमानुसार दर्शन घेण्यासाठी कोणतीच अडचण नाही. मात्र पोर्णिमा यात्रेला कदापिही परवानगी दिली जाणार नाही. अशी माहिती सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवी देवस्थानचे कार्यकारी विशेषाधिकारी श्री. रवी कोटारगस्ती यांनी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या पदाधिकारी शिष्टमंडळाला दिली आहे.

कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी सौंदत्ती येथे रवी कोटारगस्ती यांची भेट घेतली. त्याचबरोबर देवस्थानच्या वतीने देवी दर्शना संदर्भात शासनाने जारी केलेली माहिती, त्याचबरोबर विविध कामासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी बोलताना रवी कोटारगस्ती म्हणाले, देशभरासह कर्नाटक राज्यातील कोरोना संक्रमणाची माहिती घेऊन, शासनाने कोरोनाचे काही निर्बंध शिथिल केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण राज्यभरातील मंदिर आणि देवस्थानांमध्ये भाविकांना अटी आणि नियमानुसार दर्शनाची मुभा दिली आहे. कोरोना नियमांचे पालन करत भाविकांना मंदिरांमध्ये प्रवेश दिला जात आहे. भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश देताना मास्क आणि सामाजिक आंतर या संदर्भात विशेष काळजी घेतली जात आहे.
सौंदत्ती श्री रेणुका देवी मंदिरातही शासनाच्या आदेशानुसार भाविकांना देवी दर्शन दिले जात आहे. भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत शासनाच्या नियमानुसार मंदिरात दर्शन आणि विधी होत आहेत. मात्र शासनाने यात्रा सण-उत्सवाला अद्दापही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सौंदत्ती रेणुका देवीची पौर्णिमा यात्रा होणार नाही. याची भाविकांनी विशेष काळजी घ्यावी. सौंदत्तीला श्री रेणुका देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना नियमानुसार दर्शनाची मुभा दिली जात आहे. मात्र कोणत्याही प्रकारचे अन्य विधी करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. भाविकांनी गर्दी न करता नियमांचे पालन करत देवी दर्शन करावे. त्यासाठी मंदिराच्या वतीने पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. समस्त रेणुका भक्तांनी नियमानुसार देवी दर्शन करावे. मंदिर अथवा डोंगरावर गर्दी करू नये. शासनाच्या नियमांचे पालन करावे. असेही कोटारगस्ती यांनी सांगितले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष आनंदराव पाटील,उपाध्यक्ष मोहन साळोखे, सुभाष जाधव, अच्युतराव साळोखे, तानाजी चव्हाण, केशव माने, दयानंद घबाडे, रमेश बनसोडे, आनंदराव पाटील, युवराज मोळे (सर), गजानन विभुते, तानाजी बोरचाटे, बेळगावचे पत्रकार श्रीकांत काकतीकर, हिरालाल चव्हाण यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *