Monday , April 13 2026
Breaking News

खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसतर्फे आसामच्या मुख्यमंत्र्यांचा तीव्र निषेध

Spread the love

 

खानापूर : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी आणि प्रवक्ते पवन खेरा यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन केलेल्या विधानाचा खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वापरलेली ही भाषा लोकशाही आणि राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
सत्तेचा अहंकार आणि भ्रष्ट वृत्तीचा कळस निषेध व्यक्त करताना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटले की, “मुख्यमंत्री सरमा हे सध्या सत्तेच्या अहंकारात आणि भ्रष्ट विचारात पूर्णपणे बुडाले आहेत. मल्लिकार्जुन खर्गे साहेबांचे जेवढे वय आहे, तेवढी वर्षे त्यांनी या देशाच्या राजकारणात घालवली आहेत. अशा ज्येष्ठ नेत्याबद्दल ‘पागल’ सारखे शब्द वापरणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.”
गुंडगिरीची भाषा खपवून घेणार नाही
पवन खेरा यांच्याबद्दल वापरलेली अश्लील भाषा आणि ‘पेल दूंगा’ सारखी धमकीवजा विधाने ही मुख्यमंत्र्यांच्या पदाला शोभणारी नाहीत. अशा ‘गुंड’ प्रवृत्तीचा खानापूर तालुका काँग्रेसने काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला आहे.
या बेताल वक्तव्याबद्दल सरमा यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसचे नेते सुरेश जाधव यांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूरमधील ऐतिहासिक हलशी गावात महालक्ष्मी यात्रा उत्साहात

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक प्रसिद्ध हलशी गावात महालक्ष्मी यात्रा महोत्सवाचा मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *