Saturday , May 30 2026
Breaking News

हलशी-हलशीवाडी येथे लक्ष्मी यात्रेनिमित्त आज भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन

Spread the love

 

खानापूर : खानापूर, ता. हलशी-हलशीवाडी येथे लक्ष्मी यात्रेनिमित्त 13 एप्रिल रोजी भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून परिसरातील स्पर्धकमी भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी कै. दत्ता कडगावकर व वंदना कडगावकर यांच्या स्मरणार्थ प्रकाश कडगावकर (उद्योजक, नायजेरिया) यांच्या 15 हजार रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. तर द्वितीय क्रमांकासाठी 11,001 व ट्रॉफी लक्ष्मी मंदिर पेंटिंग ग्रुपतर्फे, तर तृतीय क्रमांकासाठी 9,001 व ट्रॉफी महेश बिर्जे (उद्योजक, बेळगाव) यांच्याकडून देण्यात येणार आहे.
याशिवाय चौथ्या ते दहाव्या क्रमांकापर्यंत अनुक्रमे 7001, 5001, 4001, 3001, 2500, 2000 व 1500 अशी बक्षिसे विविध मान्यवरांच्या वतीने देण्यात येणार आहेत. तसेच उत्तेजनार्थ 5 बक्षिसेही देण्यात येणार असून त्यासाठी सुनिल विठ्ठल देसाई व अनिल विठ्ठल देसाई (उद्योजक, पुणे) यांच्याकडून तर स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक चषक कै. भास्करराव शं. देसाई (आरटीओ ) यांच्या स्मरणार्थ विष्णु व संतोष रामचंद्र देसाई (पुणे) यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी मिलिंद देसाई (मो. 7760688710) किंवा विलास देसाई (मो. 8287000537) यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खत टंचाई आणि वीज समस्येवरून खानापूर समिती आक्रमक; तहसीलदार व हेस्कॉमला निवेदन

Spread the love   खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने तालुक्यातील खत टंचाई आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *