Monday , April 13 2026
Breaking News

हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने प्रकाश मरगाळे आणि अंकुश केसरकर यांचा सत्कार

Spread the love

 

खानापूर : हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने महराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे आणि मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अंकुश केसरकर यांचा सत्कार समारंभ पार पडला.

यावेळी हलशीवाडी ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्षांचा खानापूर समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सुरवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मध्यवर्ती सदस्य रणजीत पाटील यांनी केले.

नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा देऊन आपल्या भावना व्यक्त करताना हलशीवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक मारुती बाळासाहेब देसाई म्हणाले की, सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू आणि आपला सीमाप्रश्न सोडवून घेऊ. कै. दीपक दळवी यांच्या नावाप्रमाणे नूतन अध्यक्षांच्या नावातच प्रकाश आहे. नूतन अध्यक्ष मरगाळे यांच्या नावातच मरगळ झटकण्याचे सामर्थ्य आहे त्यामुळे सध्या सीमा लढ्याला आलेली मरगळ दूर करून श्री. प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करून ज्या हुतात्म्यांनी सीमाप्रश्नासाठी बलिदान दिले आणि आपले जीवन समर्पित केले त्यांचे स्वप्न साकार करू.

सत्काराला उत्तर देताना प्रकाश मरगाळे म्हणाले की, सीमाप्रश्न सोडवून घेऊ आणि सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करू. मराठी भाषिकांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलू अशी ग्वाही दिली.

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आदर्श आत्मसात करत सर्व शिवभक्तांच्या साथीने उत्सव मंडळाची जबाबदारी पेलून यंदाचा शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करू अशी ग्वाही दिली.

यावेळी खानापूर समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, रणजीत पाटील, अजित पाटील, उमेश पाटील, माजी महापौर संजय शिंदे, प्रशांत भातकांडे, सतिश पाटील, दत्ता उघाडे, विकास कलघटगी, श्रीकांत कदम, प्रवीण रेडेकर, शिवानी पाटील, मिलिंद देसाई, सुहास हुद्दार, शेखर पाटील, रमेश धबाले, अमृत शेलार, महेश जुवेकर, बाबू कोले, किरण हुद्दार, सचिन केळवेकर, गुंडू कदम, सूरज कुडूचकर, विशाल गौडाडकर,  वासू सामजी, सुरज चव्हाण यांच्यासह खानापूर समिती, बेळगाव समिती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूरमधील ऐतिहासिक हलशी गावात महालक्ष्मी यात्रा उत्साहात

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक प्रसिद्ध हलशी गावात महालक्ष्मी यात्रा महोत्सवाचा मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *