खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गस्टोळी येथील गेल्या सात आठ वर्षांपूर्वी शेतकरी वर्गाच्या पिकाला पाण्याची व्यवस्था व्हावी. यासाठी गस्टोळी कॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र नुकताच गस्टोळी कॅनल हा मंग्यानकोप (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या हद्दीतील शिवाजी नगरात कॅनल कोसळला त्यामुळे याभागातील शेतकरी वर्गाच्या पिकाच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यात एकमेव कॅनल म्हणून गस्टोळी कॅनल प्रसिद्ध आहे. गेली सात ते आठ वर्षे या कॅनेलचा वापर करण्यात आला. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामाचा कॅनल असल्याने तो काही वर्षांत कोसळला.
यामुळे भविष्यात याभागातील शेतकरी वर्गाला पिकासाठीच्या पाणाचा वापर होणे कठीण होणार आहे.
तेव्हा तालुक्याच्या आमदारानी तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून लवकरात लवकर कॅनलची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
संबंधितत कॅनलची त्वरीत दुरूस्ती करावी. अन्यथा या भागातील शेतकरी मोर्चा काढुन संबधीत खात्याला जाब विचारणार आहेत.
