खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अनेक शाळा, हायस्कूल आवारातुन तसेच इमारतीवरून विद्युत तारा गेलेल्या आहेत. त्याचबरोबर पटांगणात ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आले आहेत. याचा धोका शाळांतील विद्यार्थी वर्गाला होण्याची शक्यता आहे.
राज्यात अनेक शाळातून विद्युत ताराचा धोका होऊन अनेक विद्यार्थी वर्गाचे जीव गेले आहेत.
त्यामुळेच उच्च न्यायालयाने हेस्काॅम खात्याला आदेश दिला आहे की, शाळांच्या आवारातुन विद्युत तारा अथवा ट्रान्सफॉर्मर असेल तर तो लागलीच बदला.
मात्र याकडे संबंधित हेस्काॅम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, मागीनहाळ (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक शाळेच्या जवळुन विद्युत तारा गेल्या आहेत. याचा मार्ग संबंधित हेस्काॅम खात्याच्यावतीने बदला अशी मागणी करण्यात आली आहे.
मात्र याकडे संबंधित हेस्काॅम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे.
मागीनहाळ गावच्या शाळेच्या आवारात मुलाची नेहमीच वर्दळ असते. अशावेळी दुर्घटना घडली. तर याला जबाबदार कोण असा सवाल मागीनहाळ गावच्या ग्रामस्थांतून विचारला जात आहे. तेव्हा मागीनहाळसह तालुक्यातील अनेक शाळाच्या आवारातील वीजतारांचा मार्ग बदला अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.
