खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतींच्या स्थायी कमिटीची बैठक गुरुवारी दि. १७ रोजी नगरपंचायतींच्या सभागृहात पार पाडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलुरकर होते. तर बैठकीत नगराध्यक्ष मजहर खानापूरी, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, तसेच चीफ ऑफिसर बाबासाहेब माने होते.
यावेळी प्रेमानंद नाईक प्रास्ताविक केले. तर चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांनी उपस्थित नगरसेवकाचे स्वागत केले.
यावेळी बैठकीत मागील बैठकीमधील ठराव वाचून बैठकीला सुरूवात करण्यात आली. स्थायी कमिटीच्या बैठकीत ७ तक्रारी अर्ज आले होते. या तक्रारी अर्जावर चर्चा करण्यात आली. यावेळी महत्वाचा विषय म्हणजे सिरॅमिक फॅक्टरीने आतापर्यंत १२ लाख रूपये नगरपंचायतीला टॅक्स भरावयाचा आहे. तो आजतागायत भरण्यात आला नाही. त्यासाठी सिरॅमिक फॅक्टरीला टाळे ठोकण्यात यावे. यावर चर्चा करण्यात आली. खानापूर शहरात नगरपंचायतीची जवळपास ६५ दुकाने भाडे तत्वावर चालतात. याचे भाडे जवळपास ५ लाख रूपये येणे आहे. यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी नगरसेवकानी केली.
आता उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यात शहराला पाण्याची समस्या भेडसाविणार यावरही चर्चा करण्यात आली. त्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने काही विषयावर चर्चा करण्यात आली.
स्थायी समितीचे चेअरमन प्रकाश बैलुरकर यांच्या काळातील ही पहिलीच बैठक पार पडली.
नगरसेवक नारायण मयेकर, रफिक वारेमनी, आपय्या कोडोळी, विनायक कलाल, विनोद पाटील, नगरसेविका मिनाक्षी बैलूरकर, राजश्री तोपिनकट्टी, जया भुतकी, सायरा सनदी, त्याचबरोबर नगरपंचायतींचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आभार प्रेमानंद नाईक यानी मानले.
