Sunday , April 20 2025
Breaking News

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं 81व्या वर्षी निधन

Spread the love

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं 81व्या वर्षी निधन

Mumbai: Shiv Sena leader former minister Sudhir Joshi no more | File Photo

मुंबई: ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अत्यवस्थ होती. सुधीर जोशी यांना कोविड १९ संसर्गाची बाधा झाली होती. त्यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नुकतेच कोरोनाच्या आजारातून घरी परतले होते. सुधीर जोशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते, असं मानलं जातं. शिवसेना पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. ते शिवसेनेचे मुंबईचे दुसरे महापौर होते.

त्यांनी मुंबईचा महापौर ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी भूषवले होते. आजारपणामुळे त्यांनी १९९९ मध्ये सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते फारसे सार्वजनिक जीवनातही दिसत नव्हते.

 

 

Koo App

ज्येष्ठ शिवसेना नेते व महाराष्ट्राचे माजी मंत्री सुधीर जोशी यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे सहकारी असलेल्या सुधीरजींशी माझे वैयक्तिक संबंध होते. युती सरकारच्या काळात आम्ही अनेक वर्षं सोबत काम केले आहे. अतिशय सज्जन व्यक्तिमत्त्वाचे सुधीरजी हाडाचे शिवसैनिक होते.

Nitin Gadkari (@nitin.gadkari) 17 Feb 2022

About Belgaum Varta

Check Also

शेतकरी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, ८ जणांचा मृत्यू

Spread the love  हिंगोली : शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना हिंगोलीमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *