खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या उन्हाळ्यात कडक उन्हाळा, पावसाळ्यात मुसळधार पाऊस, हिवाळ्यात कडाक्याची थंडी अशी खानापूर तालुक्याची ख्याती आहे.
त्यामुळे खानापूर तालुक्याची प्रसिद्धी सर्वाहुन वेगळी आहे.
नुकताच थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. आणि गेल्या काही दिवसापासून कडक उन्हाचे चटके खानापूर शहरवासीयांना बसत आहे. त्यामुळे आता खानापूर शहरात शहाळे विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहेत.
खानापूर शहरातील पणजी -बेळगाव महामार्गावर शहाळे विक्रेते शहाळे मांडुन बसले आहेत. तसे शहाळ्याना ही नागरिकांतुन मागणी वाढली आहे.
मागील थंडीच्या दिवसात केवळ २० रूपयाना एक शहाळा विकला जाच होता. मात्र गेल्या काही दिवसापासुन कडक उन्हाळा सुरू झाला. उन्हाची लाहीलाही होत आहे. दुपारच्या वेळी जीवाला थंडगार वाटावे म्हणून अनेकजण शहाळे विकत घेऊन त्याचा स्वाद घेतात. त्यामुळे शहाळे विक्रीदाराना चांगले दिवस आले आहेत.
यावेळी शहाळे विक्रीदार वार्ताशी बोलताना म्हणाले की, शहाळ्याची मागणी वाढत आहे त्यामुळे आम्ही दावनगेरी भागातील खेड्यातुन शहाळ्याची ऑर्डर केली जाते. दिवसाकाठी ६० ते ७० शहाळे विकले जातात. सध्या उन्हामुळे २५ ते ३० रूपयाला एक शहाळे विकला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून मी धंदा केला जातो. यावरच माझा संसार चालतो. त्यामुळे सुखी समाधानी आहे, असे मत प्रगट केले.
Check Also
खानापूर-लोंढा महामार्गावर अपघात : एक ठार, एक गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : खानापूर-लोंढा महामार्गावर जोमतळे गावानजीक, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वेगाने रस्त्या …