खानापूर (प्रतिनिधी) : गणेबैल (ता. खानापूर) येथील श्री चांगळेश्वर शिक्षण संस्थेच्या गणेबैल हायस्कूलमध्ये सेवा समिती बेळगांव यांच्यावतीने आयोजित कोविड-१९ वायरस या विषयावर आधारीत चित्रकला स्पर्धेचे आयोजन नुकताच करण्यात आले.
या स्पर्धेत ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. कोविड-१९ वायरस यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारच्या चित्राची मांडणी केली. यावेळी तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यांना सेवा समितीच्या कार्यकर्त्यां निलम पवार, तालुका संयोजिका चिदंबरम नाईक व शिक्षक वर्ग आदीच्याहस्ते विद्यार्थ्यांना प्रमान पत्र देऊन गौरविण्यात आले. गणेबैल हायस्कूलच्या चित्रकला शिक्षिका यु. व्ही. सावंत यांनी चित्रकला विषय विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापक एस. एम. युळ्ळूरकर, यु. के. पाटील, क्रिडा शिक्षक पी. टी. चोपडे, एस. एस. काजुनेकर, पी. वाय. कोळी, जी. आर. मेरवा, एम. एस. कदम, ए. वाय. मजुकर, वाय. जी. सायनेकर, आदीनी चित्रकला स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी परिश्रम घेतले. भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta