खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात जवळपास ३५० अंगणवाडी शिक्षिका असुन तालुक्यात त्याचे ११ सर्कल केले आहेत. महिला दिनाचे औचित्य साधुन अंगणवाडी शिक्षिकांच्या स्पर्धा वयोगटाप्रमाणे १८ ते ४५ वर्षे तसेच ४५ ते ५९ वर्षे अशा दोन गटात वैयक्तिक स्पर्धा १०० मिटर धावणे, गोळा फेक, लिंबू चमचा, लांब उडी, तळ्यात मळ्यात आदी खेळाचे आयजोजन करण्यात आले. ही स्पर्धा खानापूरात मलप्रभा क्रिडांगणावर आयोजित करण्यात आली.
यावेळी बालकल्याण खात्याचे सीडीपीओ के. व्ही. राममुर्ती यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घघाटन करून प्रथम बालकल्याण खात्याच्या महिला कर्मचारी वर्गाच्या तळ्यात मळ्यात या खेळाने स्पर्धाचा शुभारंभ केला.
यावेळी खानापूर कन्नड शाळेचे क्रिडा शिक्षक श्री. बेटगेरी यांनी पंच म्हणून काम केले.
काही अंगणवाडी सर्कलमधील अंगणवाडी शिक्षिकांनी स्पर्धाना उपस्थिती दर्शविली नाही. त्यामुळे क्रीडा स्पर्धाना अंगणवाडी शिक्षिकाची संख्या कमी दिसत होती. तर काही अंगणवाडी शिक्षिकाना सर्वानाच क्रीडास्पर्धेत भाग घेण्याची इच्छा होती.
मात्र एका सर्कलमधून १८ ते ४५ वयोगटासाठी सहा अंगणवाडी शिक्षिकाना तर ४५ ते ५९ वयोगटातील सहा अंगणवाडी शिक्षिकाना भाग घेता येईल अशी सुचना करण्यात आली होती. त्यामुळे अनेक अंगणवाडी शिक्षिकांतून नाराजी पसरली होती. अंगणवाडी शिक्षिकाच्या क्रीडा स्पर्धा दिवसभर आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंगणवाडी शिक्षिकांतून उत्साह दिसुन येत होता.
येत्या दि. ८ मार्च रोजी महिला दिनादिवशी विजयी स्पर्धकाना कार्यक्रमात बक्षिसे, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती बालकल्याण खात्याचे सीडीपीओ के. व्ही. राममुर्ती यानी सांगितले.