Sunday , July 26 2026
Breaking News

युवा समितीच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

Spread the love

बेळगाव : दि. २३/०२/२०२२ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत शहापूर येथील विविध सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
प्रति वर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर गरजू विद्यार्थाना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. त्या अंतर्गत आज शहापूर येथील शाळा नंबर ४५,१५,८,१३,१६ मराठी प्राथमिक शाळेमध्ये साहित्याचे वाटप करण्यात आले.
युवा समिती सहकारी प्रशांत भातकांडे यांनी युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली तसेच मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी नवीन विद्यार्थ्यांच्या पटसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यासाठी शाळेतील शिक्षक वर्गाचे कौतुक करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापकांनी आणि उपस्थित शिक्षकांनी युवा समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले.
सदर उपक्रमाला माजी नगरसेवक राजू बिर्जे, प्रशांत भातकांडे, आकाश भेकणे, सुरज चव्हाण, सुनिल हालगेकर, आणि शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *