खानापूर (प्रतिनिधी) : रविवारी शिमोगा जिल्ह्यात बजरंगदलचा कार्यकर्ता हर्ष याचा खून करण्यात आला. खून करणार्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी खानापूर तालुका बजरंगदल, विश्व हिंदू परिषद, हिंदूस्थान संघटना, तसेच भाजप आदींनी बजरंगदल तालुका अध्यक्ष नंदकुमार निट्टूरकर यांच्या नेतृत्वाखाली उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, शिमोगा जिल्ह्यातील बजरंगदलचा कार्यकर्ता हर्ष याचा निर्घृण खून केला आहे. गेल्या काही वर्षापासून हिंदू त्वादी कार्यकर्त्यांना जिहादी संघटनाकडून टार्गेट केले जात आहे. यासाठी पोलिसांनी जिहादी संघटनावर बंदी घालावी. तसेच एसडीपीएल, पीएफआय, सीएफआय, या संघटनावर बंदी घालण्यात यावी.
तसेच शिमोगा जिल्ह्यातील हर्षचा खून केलेल्या हल्लेखोरांना शोधून काढावे व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
यावेळी बोलताना बजरंगदलचा तालुका अध्यक्ष नंदकुमार निट्टूरकर, गोविंद किरमिटे, ऍड. आकाश अथणीकर, माजी आमदार अरविंद पाटील, भाजप तालुका अध्यक्ष संजय कुबल, प्रमोद कोचेरी, ऍड. चेतन मणेरीकर, जयंत तिनेयकर, बाळू सावंत आदीनी निषेध व्यक्त केला.
यावेळी धनश्री सरदेसाई, जोतिबा रेमाणी, सुरेश देसाई, गुंडू तोपिनकट्टी, राजेंद्र रायका, शिवा मयेकर, मल्लापा मारीहाळ, नितीन गावडे, यशवंत गावडे, रवी पाटील त्याचबरोबर बजरंगदलचे कार्यकर्ते सतीश सावंत, सुहास गोवेकर, किशोर तुडवेकर, प्रशांत पाटील, आकाश चौगुले, संतोष गोरल, रोशन सुतार, व इतर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांनी निवेदनाचा स्विकार करून निवेदन सरकारकडे पाठवून देण्याचे आश्वासन दिले.