माणगांव (नरेश पाटील) : समाजकारण आणि राजकारण यांचे सुंदर असे मिलाप असणारे सामाजिक बांधिलकी जपणारे दक्षिण रायगड जिल्ह्याचे मनसे अध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसप्रीत्यर्थ समाज प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम शनिवार दि. 26 रोजी सायंकाळी सात वाजता निजामपूर येथील रसिकभाई मेहता कंपाऊंड येथे आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर महिला वर्गासाठी खास “पैठणी खेळ” आयोजित करण्यात आला आहे. पैठणी खेळ सायंकाळी 4 वाजता होणार आहे. त्याचवेळी श्रीयुत देवेंद्र गायकवाड यांना शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सात वाजता कीर्तनाच्या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. सादर कीर्तन समाज प्रबोधनकार महाराष्ट्र भूषण ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या धर्मपत्नी महिला भूषण ह.भ.प. सौ. शालिनीताई निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर उपस्थित राहणार आहेत, तरी सर्व नागरिकांनी अभिष्टचिंतन आणि कीर्तन समारंभास उपस्थिय राहावे असे रायगड जिल्हा मनसे अध्यक्ष देवेंद्र गायकवाड आणि प्रतीक राहाटे यांनी कळविले आहे.
