खानापूर (प्रतिनिधी) : अवरोळी (ता. खानापूर) येथील कृषी पत्तीन सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकताच पार पडली. या निवडणुकीत अवरोळी, चिकदीनकोप, बेळकी, कोडचवाड, कगणगी, देमीनकोप गावच्या शेतकरीवर्गाने माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली रयत अभिमानी पॅनलने निवडणूक लढवून भरघोस मतानी विजय संपादन केला व एक हाती सत्ता प्रस्तापित केली.
यावेळी माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकाचा पुष्पहार घालुन, गुलाल उधळुन सत्कार केला. तसेच विजयोत्सव साजरा केला.
यावेळी बोलताना माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील म्हणाले की, आपण तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे राजकरण न करता अवरोळी व तालुक्यातील विविध कृषी पत्तीन सहकारी संघाना प्रगती पथावर कसे आणता येईल तसेच शेतकरी वर्गाचे कल्याण कसे करता येईल हे साध्य करायचे आहे. तेव्हा सर्वानी कृषी पत्तीन संहकारी संघाच्या पाठीशी उभे राहून प्रगती साधा असे आवाहन केले.
पुढे म्हणाले की, खानापूर तालुक्यातील कृषी पत्तीन सहकारी संघाच्या इमारती तसेच गोडाऊन उभारण्यासाठी डीसीसी बॅकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी मंजुर करण्याचे काम माझे आहे. तसेच शेतकरी वर्गाला जास्तीत जास्त बीन व्याज कर्ज मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध आहे. असे आश्वासन दिले.
यावेळी नवनिर्वाचित संचालक, सभासद, गावचे शेतकरी, ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta