Tuesday , June 25 2024
Breaking News

खानापूर हायटेक बसस्थानक भूमिपूजन कार्यक्रमाला मंत्र्यांची दांडी

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील बसस्थानक हायटेक बसस्थानक होणार. यासाठी भूमिपूजन कार्यक्रमाला राज्याचे मंत्री उपस्थित राहणार होते.
मात्र भाजप सरकारचे मंत्री तालुक्यात आमदार अंजली निंबाळकरांच्या कार्यक्रमाला पालकमंत्री गोविंद कारजोळ, परिवहन मंत्री श्रीरामुलू, वनमंत्री उमेश कत्ती, मंत्री शशिकला जोल्ले, तसेच खासदार, आमदाराना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र मंत्र्यापासुन आमदारपर्यंत कोणाचीच उपस्थित लाभली नाही.
त्यामुळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अंजली निंबाळकर होत्या. तर कार्यक्रमाला नगराध्यक्ष मजहर खानापूरी,उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, नगरसेवक प्रकाश बैलूरकर, प्रकाश मादार व नगरसेविका उपस्थित होत्या.
तसेच काँग्रेस नेते मंडळी उपस्थित होती.
यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोळी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात केली

यावेळी खानापूर जांबोटी क्राॅसवरील बसस्थानक हे हायटेक बसस्थानक होणार यासाठी कर्नाटक भाजप सरकारने साडेसात कोटीचा निधी मंजुर केला आहे.
यावेळी खानापूर हायटेक बसस्थानकात प्लॅटफॉर्म, कँटीन, रेस्टॉरंट, पिण्याचे शुध्द पाणी, पुरूष व महिलांना स्वतंत्र स्वच्छता गृहे, दुचाकी स्टॅड, रिक्षा स्टॅड, दुकान गाळे आदीची सोय होणार असुन येत्या ११ महिण्यात खानापूरचे हायटेक बसस्थानक उभे राहणार आहे, असा विश्वास व्यक्त केला

हायटेक बसस्थानकाच्या भूमीपूजन कार्यक्रमाला तालुक्यातील भाजप पक्षाच्या नेते मंडळीनी तसेच कार्यकर्त्यांनी पाठ फिरविली होती. तर तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नेते मंडळी तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविला नाही.
त्यामुळे कार्यक्रम थोडक्यातच आवरण्यात आला. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

दि. विनर्स सौहार्द सोसायटी जांबोटी, शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न

Spread the love  खानापूर : दि. विनर्स सौहार्द सोसायटी नियमित, जांबोटी या संस्थेचे दि. 20 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *