Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर नगरपंचायतीकडून नूतन शववाहिनीची सोय

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत गेला. अनेक उपनगरे वाढली. तशा समस्याही वाढल्या. खानापूर शहराला गेल्या कित्येक वर्षांपासून शववाहिनीची गरज नेहमीच वाटत होती.
याशिवाय खानापूर शहरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीकडे सातत्याने शववाहिनीची समस्या मांडून शववाहिनीची सोय करावी, अशी मागणी केली होती.
पुर्तता नगरपंचायतीने करून शववाहिनी सोय केली.
या नूतन शववाहिनेचे पुजन करून लवकरच तीचा वापर करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार अंजली निंबाळकर यांनी पुजन करून चालना दिली.
यावेळी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, स्थायी कमिटीचे चेअरमन प्रकाश बैलूरकर, नगरसेवक आपय्या कोडोळी, लक्ष्मण मादार, नारायण मयेकर, विनायक कलाल, नारायण ओगले, हणमंत पुजारी, विनोद पाटील, महंमद रफीक, नगरसेविका मिनाक्षी बैलुरकर, लता पाटील, सहेरा सनदी, मेघा कुंदरगी, जया भुतकी, राजश्री तोपिनकट्टी तसेच चीफ ऑफिसर बाबासाहेब माने, प्रेमानंद नाईक, एस. आर. पाटील तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते, खानापूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर प्रेमानंद नाईक यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *