संकेश्वर (प्रतिनिधी) : हुक्केरी मतक्षेत्राचे आमदार, राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांना दिर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून हुक्केरी मतक्षेत्राचा सर्वांगिण विकास होवो असे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. मंत्री उमेश कत्ती यांचा वाढदिवस सोहळ्यानिमित्त आज मंत्रीमहोदयांच्या बेल्लद बागेवाडी येथील निवासस्थानी निडसोसी मठाचे परमपूज्य. पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी, संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींंची पादपूजा ठेवून घेण्यात आली होती. त्यात मंत्री उमेश कत्ती, धर्मपत्नी सौ. शीला उमेश कत्ती आणि कत्ती परिवाराच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता. निडसोसी श्री पुढे म्हणाले, मंत्री उमेश कत्ती यांनी हुक्केरी मतक्षेत्रात विकासाभिमुख कामे केली आहेत. त्यांच्या हातून मतक्षेत्रातील जनतेची अशीच सेवा घडावी अशा सदिच्छा श्रींनी दिल्या. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी म्हणाले, आपण काशी प्रवासदौऱ्यावर जात असल्याने उद्याच्या वाढदिन सोहळ्यात आपण सहभागी होऊ शकणार नाही. मंत्रीमहोदयांच्या पाठीशी आपला आशीर्वाद कायम आहे. मंत्रीमहोदयांनी मतक्षेत्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या समस्या निवारणासाठी सदैव कटिबध्द राहायला हवे असल्याचे श्रींनी सांगितले. यावेळी संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, विद्युत संघाचे संचालक कुणालगौडा पाटील, नंदू मुडशी, प्रशांत पाटील, प्रदीप माणगांवी उपस्थित होते.
Check Also
शेतात पडलेली अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी तब्बल 38 वर्षानी मिळाली…
Spread the love निपाणी : 1987 साली यरनाळ येथील शेतात ऊस लागण करताना पडलेली माझ्या …