
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांची एकी करण्यासंदर्भात पंचसदस्यीय कमिटीच्या वतीने बैठक बोलाविण्यात आली आहे. याबाबत दोन्ही गटांच्या प्रमुखांना लेखी पत्राद्वारे बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे. सदर बैठक गुरुवार दि. 24 मार्च रोजी दुपारी 2 वाजता हब्बनहट्टी येथील मारुती मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. 2018 साली विखुरलेल्या समितीच्या दोन्ही गटातील प्रत्येकी दहा सदस्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, तसेच एकीसंदर्भात चर्चा करावी, असे पंचसदस्यीय कमिटीचे सदस्य आबासाहेब दळवी, डी. एम.भोसले, शिवाजीराव पाटील, पुंडलिक पाटील, कृष्णा कुंभार यांनी कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta