Wednesday , March 4 2026
Breaking News

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढुन तहसीलदार प्रविण जैन यांना निवेदन सादर केले.
निवेदनात अनेक, मागण्या मांडल्या असुन एलकेजी, यूकेजी वर्ग सुरू करणे, पाळणा घर अंगणवाडीत सुरू न करता बाहेर करणे, महागाई भत्ता ३० रूपये वाढ करून देणे, दहावी पास झालेल्या मराठी सहाय्यकीला बढती देणे, ५० हजार रूपये व ३० हजार रूपये भविष्य निर्वाह निधी देणे, बेळगाव जिल्ह्यातील मिनी अंगणवाडीना बढती देणे, लाभार्थी बाळंतीणा व मुलाना देण्यात येणाऱ्या अंड्याचे दर बाजार दराप्रमाणे देणे. दोन वर्षांपासून समवस्त्र देण्यात आली नाही ते त्वरीत देणे. सेवेत दीर्घकाळ आजारी असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्ती करा व समाधानकारक वृध्दापवेतन द्या. अंगणवाडी शिक्षणासाठी सुपरवाझर बढतीसाठी १०० जागा रिक्त ठेवणे, अंगणवाडी गॅस, रिपेरी, पाईप बदलणे, सिलेंडर वाहतुकीसाठी खर्च देणे, रेशनचे साहित्य अंगणवाडीच्या वेळेत पाठविणे आदी मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी तहसीलदार प्रविण जैन यांनी निवेदनाचा स्विकार करून सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना मेघा मिठारी, भारती पै, अनिता पाटील, जानकू देसाई, अनिता कडोलकर, ज्योती बोबाटे, उषा गावडे, लता पाटील आदीसह शेकडो अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *