खानापूर (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे खानापूर तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी करून सोडले. प्राणीमात्रांनाही याचा त्रास माणसाप्रमाणे झाला. याची प्रचिती नुकतीच आली. जळगे (ता. खानापूर) नारायण निलजकर यांच्या शिवारातील पाण्याच्या प्रवाहातुन वाहत आलेल्या नागसर्पाला पकडून त्याला जंगलात सोडण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगे येथील शेतकरी नारायण निलजकर यांच्या शिवारात पाण्याच्या प्रवाहातून नागसर्प आला होता.
याची माहिती यडोगा येथील सर्प मित्र उमेश आंधारे याला देण्यात आली. लागली उमेश आंधारे यांनी घटनास्थळी दाखल होऊन नागसर्पाला पकडले. यावेळी नागसर्पाने एका सापालाही गिळले होते. त्याही सापाची सुटका करून, नागसर्पाला पकडून घनदाट जंगलात सोडण्यात आले.
याबद्दल सर्पमित्र उमेश आंधारे अभिनंदन केले.
