Saturday , July 27 2024
Breaking News

बेळगाव सीमाभाग हा महाराष्ट्राचा आत्मा.. : खासदार संजय राऊत

Spread the love

मातृभाषेतून शिक्षण हा सर्वांचा नैसर्गिक आणि न्याय हक्क : संमेलनाध्यक्ष श्रीराम पचिंद्रे

बेळगाव : “बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र हा झाला पाहिजे यासाठी हुतात्मे दिलेले आहेत, तिथल्या व्यक्तीला जेव्हा काठी बसते त्याचा वळ आम्हाला जाणवतो. सीमाभागात मराठी संस्कृती नांदते आहे. सीमाभागात शैक्षणिक व साहित्य संमेलनातून भाषा संस्कृतीचे संवर्धन केले जात आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक सहकार्य करण्याचा मी प्रयत्न करेन. म्हणून बेळगाव सीमाभाग हा महाराष्ट्राचा आत्मा आहे,असे प्रतिपादन संमेलनाचे उद्घाटक या नात्याने खासदार संजय राऊत यांनी काढले.”

लेखकांनी सामाजिक विषमतेविरुद्ध लढले पाहिजे, सामाजिक समतेची कास धरून पुढे गेले पाहिजे, सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार करत असलेल्या अत्याचाराला लेखकांनी विरोध केला पाहिजे. ऐंशी टक्के मराठी भाषिक असलेल्या सीमाभागाचा समावेश महाराष्ट्रात करण्यासाठी लेखकांनी आग्रही असले पाहिजे. मातृभाषेतून शिक्षण हा सर्वांचा नैसर्गिक आणि न्याय्य हक्क आहे, असे प्रतिपादन दुसर्‍या दूरदृश्य प्रणाली बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध लेखक, कवी, संपादक श्रीराम पचिंद्रे यांनी केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या बेळगाव शाखेने संमेलनाचे आयोजन केले होते.

श्री. पचिंद्रे पुढे म्हणाले, पत्रकार हा वास्तवाची मांडणी वस्तुनिष्ठ पद्धतीने करतो, तर साहित्यिक वास्तवाला कलात्मक उंचीवर नेत असतो. लेखक नवनिर्मिती करतो, वास्तवाची सर्जनशील मांडणी करतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे महत्त्वाचे आहे, पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हे लेखकांनी ध्यानात ठेवावे. सरकारवर टीका करणे म्हणजे देशद्रोह नव्हे, टीका लेखक आणि विचारवंत करत असतात. विद्रोह अवश्य केला पाहिजे, पण तो विधायक अशा परिवर्तनासाठी असावा, असा विद्रोह करताना त्याला विवेकाची जोड हवी, असेही श्री. पचिंद्रे म्हणाले.

समाजाच्या जडणघडणीत साहित्य समाजाबरोबर आहे. साहित्य समाज घडवण्यासाठी, जागृतीसाठी कार्य करत असते. साहित्य समाजाला वरती घेऊन जात असते साहित्यीक व पत्रकार हे दोघेही समाजासाठी लिहीतअसतात दोघांचं एकमेकांशी नात असत. दोघांचे व्यक्त करण्याचे आशय द्रव्य म्हणजे भाषा असते. भाषा ही संवाद साधण्याचे माध्यम आहे. पत्रकार घडलेल्या घटना वस्तुनिष्ठ मांडत असतो तर साहित्यिक घटनेला कलेच्या उंचीवर नेऊन मांडतो त्यामुळे दोघांचेही स्थान समाजात महत्वाचे आहे. उदनयोन्मुख साहित्यिकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले काळाच्या प्रवाहात काळाच्या कसोटीवर टिकणारे लेखन करावे. वरकरणी केलेले लेखन टिकत नाही. मनातून केलेले लेखन टिकते. पाचहजार मातृभाषा भाषा शब्दकळा मूल जन्म घेताना असते म्हणून मातृभाषा ही महत्वाची आहे म्हणून विज्ञान तंत्रज्ञानात यशस्वी होण्यासाठी मातृभाषेत शिक्षण हवं. भाषा आणि संमेलने ही वैश्विक आहेत. सीमाभागातील 865 गावात मराठी संस्कृतीचा समृद्ध वारसा आहे. कर्नाटक महाराष्ट्र राज्यांनी एकत्र येवून समन्वयाने केंद्राने मध्यस्थी करून सीमाप्रश्न निकाली काढला पाहिजे, असे प्रतिपादन स्वागताध्यक्ष शरद गोरे यांनी केले.

संमेलनाच्या सुरुवातीला सीमाभागात साहित्य संमेलन ही मराठी संस्कृतीला ऊर्जा देणारी आहे. संमेलने भाषा संस्कृतीचे संवर्धन, साहित्यिकांना लिहिण्याचे बळ मिळावे, मराठी वाचन संस्कृती रुजावी व नवोदित कवींना संधी मिळावी ही भूमिका सीमा भागातील संमेलनाची आहे. यासंमेलनाना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक तरतुद करण्यात यावी असे प्रास्ताविक मध्ये अखिल भारतीय परिषदचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यानी सांगितले.

सकाळी ११ वा. संमेलनाला गुगल मीटव्दारे ऑनलाईन संमेलनाला सुरुवात झाली. यावेळी उदघाटन सत्राला विशेष अतिथी म्हणून शिवसंत संजय मोरे, परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर, राष्ट्रीय विश्वस्थ ज्ञानेश्वर पतंगे, संयोजक बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण व उदघाटन सत्राचे सुत्रसंचालन उपाध्यक्ष डी.बी.पाटील यांनी सुत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *