खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायत वतीने प्रत्येक घरी ओला व सुका कचरा निर्मूलनासाठी बकेटचे वितरण करण्यात आले.
भारत सरकार कर्नाटक सरकार यांच्यावतीने स्वच्छ भारत योजनेअंतर्गत बेकवाड ग्राम पंचायत क्षेत्रात बेकवाड गायरानमध्ये पाच एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. या जागेमध्ये शेड बांधण्यासाठी वीस लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे आठ लाख रुपये पाच एकर जमीनीची हद्द कारणासाठी, दोन लाख रुपये झाडे लावण्यासाठी असा तीस लाख रुपयाचा फंड मंजूर केला आहे व हा कचरा गोळा करण्यासाठी एस एल डब्लू एम योजनेअंतर्गत 2040 बकेटचे वितरण करण्यात आले. हा कचरा गोळा करण्यासाठी 15 व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत पाच लाख रुपये कचरा गाडीची खरेदी करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला ग्राम पंचायत विकास अधिकारी नागप्पा बने, अध्यक्ष यल्लापा गुरव, ग्राम पंचायत समितीचे सदस्य रूक्माना झुंजवाडकर, संजय कोलकार, गजानन पाटील, परशराम मंडवळकर, नामदेव कोलेकर, गुणवंती तळवार, शबाना मुजावर, मोहिनी येळ्ळूरकर, ज्योती गुरव, नूतन भुजगुरव, गंगू हळब व गावातील नागरिक उपस्थित होते
Check Also
खानापूर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणूक २७ रोजी; दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी राखीव
Spread the love खानापूर : खानापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा …