खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे साजरा होणारा राष्ट्रीय उत्सव स्वातंत्र्य दिन खानापूरात साजरा होईल, खरोखर यंदाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात हवा होता. मात्र देशभर कोरोनाच्या महामारीने हाहाकार माजविला. त्यामुळे कोविड १९ चे नियम पाळून यंदाचा १७ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साधेपणाने साजरा करायचे आहे. ठीक ९ वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात झेंडा फडकावुन स्वातंत्र्य साजरा करायचा आहे.
यादिवशी हेस्काॅम खात्याच्यावतीने शिवस्मारकतील शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला, जांबोटी क्राॅसवरील बसवेश्वर पुतळ्याला व इतर ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात येईल, स्वातंत्र्य दिन निमित्ताने स्वातंत्र्य सैनिकाचा, पत्रकारांचा सत्कार करणे, ७५ वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन विशेष सजावट करणे आदी विचार आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केले.
यावेळी व्यासपिठावर तहसीलदार रेश्मा तालिकोटी, पोलिस निरीक्षक सुरेश सिंगे उपस्थिती होते.
बैठकीला उपतहसीलदार के. आर. कोलकार, एम. सी. छोटण्णावर, बीईओ ऑफिसचे मॅनेजर प्रकाश होसमनी, आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एस. कोडगी, नगरपंचायतीचे प्रेमानंद नाईक, एस. आर. पाटील, तसेच समाज सेवक रवी काटगी, नगरसेविका मेघा कुंदरगी, एन. सी. तलवार, इतर अधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविक व आभार एम. सी. छोटण्णावर यांनी मानले.
Check Also
खानापूर तालुक्यात साकारणार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिलीच मूर्ती
Spread the loveखानापूर : देशाचे संविधान निर्माते, दीनदयाळांचे आधार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ …