Wednesday , December 10 2025
Breaking News

खानापूरात भाजपच्यावतीने डॉ. आंबेडकर जयंती साजरी

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी खानापूर मंडल यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी प्रकाश गावडे यांनी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले.
यावेळी भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले. तर उपस्थित भाजप नेते जोतिबा रेमाणी, मारुती पाटील, एससी मोर्चा अध्यक्ष शिवू चलवादी, एससी मोर्चा जिल्हा प्रधान कार्यदर्शी चंद्रकांत कोलकार, महंतेश बाळेकुंद्री, बाबू अन्ना बाळेकुंद्री, सयाजी पाटील, प्रकाश गावडे, रवी बडगेर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बोलताना बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले की, आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार, पत्रकार, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, जागतिक मानवमुक्तीच्या चळवळीतील एक शिलेदार, बहुजनांचे कैवारी, प्रखर कायदेपंडित, शेतकर्‍यांचे वाली, स्त्रियांना घटनात्मक समान दर्जा देणारे, मुक्तीदाता, बहुजनांचा मूकनायक, बोधिसत्व, विश्वरत्न, प्रज्ञासूर्य, विद्येचा महामेरू, जगाने ज्यांचा सन्मान ’सिम्बॉल ऑफ नॉलेज’ असा केलेले महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे आचरण करणे ही काळाची गरज आहे. तेव्हा प्रत्येकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरण आणले तर समाज चांगल्या मार्गाने वाटचाल करील असे विचार व्यक्त केले.
यावेळी रवी बडगेर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *