Tuesday , March 3 2026
Breaking News

खानापूरच्या जंगलातील चिगुळे गावात रॉकेलची सोय करा

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याचा पश्चिम भाग हा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. पावसाळ्यात उन्हाळ्यात या भागात या-ना त्या कारणाने वीज पुरवठा खंडीत होत असतो. त्यातच अतिपावसाचा परिसर असल्याने सतत पाऊस पडत असतो. अशावेळी आग पेटून शेकोटीशिवाय जगताच येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना रॉकेलची नितांत गरज आहे. रॉकेलवीना पावसाळ्यात दिवस काढताना अनेक त्रास सहन करावे लागतात.
रात्रीच्यावेळी वीजपुरवठा खंडीत होऊन अंधाराचे साम्राज्य पसरते. अंधारातून हिस्त्र प्राणी गावात शिरतात. अशावेळी नागरिकांच्या जीवाला धोका संभवतो. निधान रॉकेलची सोय झाली तर रॉकेलच्या उजेडात राहाता येईल.
यासाठी सरकारने तसेच लोकप्रतिनिधींनी तालुक्याच्या पश्चिम भागातील घनदाट जंगलाने व्यापलेल्या भागातील रेशन दुकानातून रॉकेलची व्यवस्था करावी, अशी मागणी चिगुळे गावचे माजी सैनिक गणपत गावडे यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *