
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील घोटगाळी ग्राम पंचायतीच्या विकास कामाबाबत काही विघ्नसंतोषी नागरिकांनी बिनबुडाचे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे, असे मत ग्राम पंचायत अध्यक्ष संतोष मिराशी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्री योजनेंतर्गत सरकारने गावच्या विकास व्हावा, लोकाना रोजगार मिळावा, या उद्देशाने ही योजना सर्वत्र सुरू केली आहे. त्याचप्रमाणे घोटगाळी ग्राम पंचायत कार्य क्षेत्रात रोजगार हमी योजना सुरू आहे. असे असताना २०२० साली रोजगार कामासाठी मेढ नेमणूकीबाबत त्या कामगारावरती काही लोकाच्या आधारे मेढ नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २०२१-२२ साठी मेढ बदली संधीचा लाभ सर्व रोजगाराना मिळावा. तसेच काम सर्व रोजगाराना मिळावा. याप्रमाणें आम्ही सर्व ग्राम पंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सर्वानी मेढ नविन नेमणूक करावी. व जुणा मेढ कमी करण्यात यावे असे सर्व सदस्यांचे म्हणणे होते.
यासाठी ज्या व्यक्तीला मेढ होण्याची इच्छा आहे त्या व्यक्तीचे इयत्ता आठवी पर्यंतचे शिक्षण हवे. त्याना मोबाईल ऑपरेट करणे गरजेचे आहे. तसेच कन्नड भाषा येणे सक्तीचे आहे. असा ठराव केला. मात्र जुन्या सदस्यांनी यावर खोटे आरोप करून आमची बदनामी केली. हे आरोप सिध्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याच बरोबर ओबंडसवरती केस दाखल केली.
याबाबत दोन, तीन वेळा त्यांना सत्यता पडताळण्यासाठी नोटीसा पाठविल्या मात्र तेच हजर राहिले नाहीत.
यावेळी सदस्य रफिक हलशीकर म्हणाले की, ग्राम पंचायतीच्या विकासाबाबत गोंधळ माजविण्यात येत आहे. मात्र १ कोटी ३५ लाख रूपयाची विकास कामे झाली असुन राजीव सेवा केंद्र, नविन सीसीरोड, रोडचे मेंटलीग, जनावरांचे गोटे, आदी काम उत्कृष्ट दर्जाची राबविली आहेत. तरी विकासात आडथळे आणून त्रास देण्याचे काम करत आहेत. एवढेच नव्हे तर
दुसरीकडे खानापूर तालुक्यात एनआरजीमध्ये घोटगाळी ग्राम पंचायतीने व्दितीय पटकाविला असे असताना काही विघ्नसंतोषी नागरिकांनी घोटगाळी ग्राम पंचायतीची बदनामी करण्याचे कट कारस्थान करत आहे. यावर लोकानी विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी उपाध्यक्षा तसेच सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta