Tuesday , March 3 2026
Breaking News

खानापूर तालुक्यातील तलाठी चोटन्नावर, पवार यांना बढतीनिमित्त निरोप

Spread the love


खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध गावांत ग्राम लेखापाल अर्थात तलाठी म्हणून काम पाहिलेल्या एम. पी. चोटन्नावर आणि एस. एन. पवार यांची पदोन्नतीवर अन्यत्र बदली झाली आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार करून त्यांना प्रेमाचा निरोप देण्यात आला. तलाठी मारुती चोटन्नावर यांची एफडीसी म्हणून बैलहोंगल प्रांताधिकारी कार्यालयात बढतीवर बदली झाली आहे. त्याचप्रमाणे एस. एन. पवार यांची एफडीसी पदी बेळगाव वक्फ बोर्डाच्या कार्यालयात बढतीवर बदली झाली आहे. त्यानिमित्त या दोघांना खानापूर तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सत्कार करून निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी के. वाय. बिद्री होते.
यावेळी तालुक्यातील तलाठ्यांच्या वतीने या दोघांचा सत्कार करून त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपतहसीलदार कल्लप्पा कोलकार, विनायक वेंगुर्लेकर, सादिक पाच्छापुरी, विरेश पाटील, आर. एस. बागवान, मोशीन दर्गावाले, शशिकला कुंदगोळ आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *