भरमानी पाटील यांची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील सर्वात जुना गस्टोळी कॅनल तुटून गेल्याने सहा महिन्यापासुन गस्टोळी परिसरातील विजयनगर, गस्टोळी, गस्टोळी दट्टी, भुरूनकी, चिंचवाड, मास्केनट्टी, करकट्टी आदीसह अनेक गावच्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला.
याला वाचता फोडण्यासाठी खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांनी गस्टोळी कॅनलची समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्न केल्याने संबंधित लुघ पाणी पुरवठा खात्याने दखल घेऊन पाणीपुरवठ्यासाठी पाईप टाकून कामाला सुरुवात केली.
याची पाहणी खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांनी नुकताच करून गस्टोळी कॅनलची पाईपलाईनव्दारे त्वरीत पाणी पुरवठा सुरू करावा.
जेणे करून शेतकरी वर्गाच्या ऊस पिकाबरोबर उन्हाळी भाजीपाला पिकाला पाण्याची व्यवस्था होऊन शेतकरी वर्गाला चार पैसा मिळेल.
संबंधित लघु पाणी पुरवठा खात्याकडे केल्याने येत्या काही दिवसात गस्टोळी कॅनलच्या पाईपलाईनद्वारे शेतकरी वर्गांच्या जमिनीला पाणी पुरवठा होईल व शेतकरी वर्गांला याचा लाभ होईल, असे सांगितले.
यावेळी या भागातील शेतकरीवर्ग उपस्थित होता.
Belgaum Varta Belgaum Varta