खानापूर : रविवार दि. 29 रोजी दुपारी खानापूर तालुका समितीला कांहीं कार्यकर्त्यांनी मला जबरदस्तीने नेऊन खोटेनाटे सांगून खानापूर समितीच्या एकीच्या प्रक्रियेत बाधा आणण्याच्या हेतूने माझ्याकडून त्यांनी लिहिलेले वाचून घेतले. त्या दरम्यान त्यांनी जाणीवपूर्वक माझा व्हिडीओ काढला आणि तो समाज माध्यमांवर प्रसारित केला. त्यामुळे तालुक्यातील समिती कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला. त्याकरिता कृपया समिती प्रेमींनी संभ्रमात न राहता शिवस्मारकामध्ये होणाऱ्या आजच्या महत्वपूर्ण बैठकीला निसंदेह उपस्थित राहावे. तसेच समितीच्या बळकटीसाठी मुद्दे मांडावेत, असे आवाहन ज्येष्ठ नेते देवाप्पा गुरव यांनी केले आहे. यावेळी माजी आ. दिगंबर पाटील, मारुती गुरव यांनीदेखील घडलेल्या प्रकाराबद्धल खंत व्यक्त करत चळवळीत व्यत्यय आणणाऱ्या विघ्नसंतोषींचा निषेध केला.
Check Also
गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी
Spread the love खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा …