Saturday , July 27 2024
Breaking News

मातृभाषेतुन शिक्षण घेणे, हाच भविष्यातील पाया आहे : प्रा. मनीषा नाडगौडा

Spread the love

बेळगाव : आत्मविश्वासातून आयुष्यात चांगले वळण लागते. अभ्यासाबरोबरच छंद जोपासावा, खेळात प्राविण्य मिळवावे जिद्द कसोटीतून आपण आपले ध्येय गाठू शकतो आदर, प्रामाणिकपणा हेच गुण जीवनात यशस्वी करू शकतात. मातृभाषेतून शिक्षण घेणे हाच भविष्यातील पाया आहे, असे प्रतिपादन प्रा. मनीषा नाडगौडा, बी.डी. जती कॉलेज यांनी अध्यक्षपदावरून विद्यार्थी गौरव सोहळ्यात विचार व्यक्त केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालय कावळेवाडी त्यांच्यातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. एस.एस.एल.सी. परीक्षेत विशेष प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.
सुरूवात इशस्तवन स्वागत गीताने झाली. श्रीसंत ज्ञानेश्वर प्रतिमेचे पूजन ग्रामस्थ मंडळाचे सचिव के. डी. यळूरकर यांनी केले, महात्मा गांधी प्रतिमेचे पूजन ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जोतिबा मोरे केले.
प्रारंभी वाय.पी. नाईक यांनी प्रास्ताविक करून गेल्या चार वर्षात राबविलेल्या उपक्रमाचा आढावा घेतला. महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेने उत्कृष्ट कार्यासाठी अनुदान दिले. भविष्यातही गावच्या सहकार्यातून विविध उपक्रम राबविणार आहे. गुणवंताचा गौरव करून प्रोत्साहन व प्रेरणा, कौतुकाची थाप देणे हेच या संस्थेचे ध्येय असल्याचे स्पर्धा केले.
अध्यक्षा प्रा. मनीषा नाडगौडा यांचे स्वागत भारती नाईक, यांनी शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन केले. मान्यवरांना सन्मानचिन्ह, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यशवंतराव मोरेनी स्वागत केले.
याप्रसंगी प्रसिद्ध वकील अणासाहेब घोरपडे यांनी मौलिक विचार व्यक्त करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात गुणवत्ता आहे. विद्यार्थी चिकाटीने अभ्यास करतो त्यातूनच ते गाव, शाळा व देशाचे नाव उज्ज्वल करतात. ९० टक्केच्या वर गुण घेऊन खऱ्या अर्थाने गुणवत्ता सिद्ध केली आहे. जीवनात आपण गूरु, आईवडील याचा आदरराखुन ध्येयसाध्य करण्यासाठी सतत वाचन करावे. ही संस्था वैचारिक परिवर्तन करणारे शैक्षणिक उपक्रम राबवित आहे हे कौतुकास्पदआहे. असे उदबोदक विचार मांडले.
यावेळी बेळवटी ग्राम पंचायतचे अध्यक्ष म्हाळू मजकूर, सौ. मनीषा सुतार, ग्रामपंचायत सदस्य बिजगर्णी, गावातील पदव्युत्तर सूरज कणबरकर, वकील मनोहर प. मोरे,नयांचाही विशेष सन्मान अण्णासाहेब घोरपडे यांच्याहस्ते शाल, सन्मानचिन्ह, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन केला
एस.एस.एल.सी. परीक्षेत विशेषयश संपादन केलेल्या विद्यार्थीनीचा व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य, सन्मानचिन्ह देऊन कौतुकाची थाप, प्रोत्साहनदेण्यासाठी सन्मानीत केले.

कु. अस्मिता ग. पाटील (बेळवटी), प्रतिभा प्र. शेळके व मीरा स. मोटणकर (कर्ले), दिया दे. मोरे (बिजगर्णी), सारिका ह. केसरकर (राकसकोप), करुणा अ. लोहार, अतुल निं. आवडण, राजनंदिनी दे. पाटील, सिफा तासिलदार (बेळगुंदी), रविना वि. बसरीमरद ९९.६८% (हेरवाडकर टिळकवाडी), गावातील कु.आरती य. मोरे ९४%, सेजल द. यळूरकर ९०% या गुणवत्ताधारकाना शुभेच्छा दिल्या.
सन्मानचिन्ह, फोल्डरफाईल्स, पेन प्रदान करून प्रोत्साहित केले.
शिक्षक कोमल पा.गावडे, पालक यशवंतराव टी. मोरे यांनीही मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा कवयित्री प्रा.मनीषा नाडगौडा, वकील अण्णासाहेब घोरपडे, संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक, कलापा यळूरकर, जोतिबा मोरे, शिक्षिका विजया नाईक, लक्ष्मण जाधव, दयानंद यळूरकर, पांडुरंग मोरे, कोमल गावडे, यशवंतराव मोरे, राजेश्वरी राजनाळ, म्हाळू मजकूर, मनीषा सुतार उपस्थित होते.
याप्रसंगी मोहनराव मोरे यांचेकडून फोल्डरफाईल्स, भाऊराव र.कणबरकर कडून पेनसेट, अण्णासाहेब घोरपडे यांनी रू. पाच हजार, पोमाणा कुनूरकर रू.1500/-, मनीषा नाडगौडा, 1000/-, विनयकुमार 1000/-, विलास रा.बसरीमरद ₹.500/- म्हाळू मजकूर 500/-, मनीषा सुतार..200/-, दयानंद यळूरकर ₹.500/-, प्रकाश शेळके 500/-, लक्ष्मण म. जाधव 200/-, अरुण लोहार 150/-, कलापा यळूरकर ₹ 151/-प्रसाद जाधव ₹.700/- अशा देणग्या दात्तुतव भावनेने प्राप्त झाल्या.
याशैक्षणिक कार्यक्रमला गावातील व परिसरातून बेळगुंदी, सोनोली, गणेशपूर, हंगरगा, नावगे, टिळकवाडी, तुडये(चंदगड) बडस, बाकनूर, यळेबैल, कर्ले गावचे विद्यार्थी, पालकवर्ग मैठ्या संख्येने सहभागी होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कांचन सावंत, पृथ्वी जाधव, रेखा मोरे, अभिषेक सुतार, सानिका भ. मोरे, प्रणाली र. मोरे, पी. एस. मोरे, एम. पी. मोरे, रघुनाथ बाचीकर यांनी अधिक परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन-वकील मनोहर प. मोरे व आभार शिक्षक कोमल पा. गावडे यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *